कॅशिअरच्या प्रामाणिकपणाचे तळोद्यात कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:56 IST2020-07-11T12:56:49+5:302020-07-11T12:56:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : हव्यासापोटी अनेक जण खोटे बोलून रेटून नेतात. परंतु समाजात काही प्रामाणिक लोकदेखील आहेत. त्याचे ...

कॅशिअरच्या प्रामाणिकपणाचे तळोद्यात कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : हव्यासापोटी अनेक जण खोटे बोलून रेटून नेतात. परंतु समाजात काही प्रामाणिक लोकदेखील आहेत. त्याचे उदाहरण तळोदा येथील बँकेत दिसून आले.
याबाबत माहिती अशी की, बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या ग्राहकाकडून एक लाख रूपये जास्तीचा भरणा झाला असल्याचे गुरुवारी हिशोब करताना लक्षात आले. ती रक्कम कोणत्या ग्राहकांची आहे याचा तपास करून बँकेच्या रोकड अधिकाऱ्याने ती रक्कम बँक ग्राहकास प्रामाणिकपणे परत केली. भारतीय स्टेट बँकेच्या तळोदा शाखेतील रोकड अधिकाºयाने दाखविल्याने या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होतआहे.
७ जुलैला स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तळोदा शाखेत नीलिमा शिवाजी पावरा आपल्या बँक खात्यात भरणा करण्यासाठी मुलासोबत आल्या होत्या. त्यांच्याकडील हॅण्डबॅगमधील रक्कम त्यांनी खात्यावर भरण्यासाठी पावतीसह काऊंटरवर रोकड अधिकारी असलेले सागर भोंडवे यांच्याकडे दिली. रक्कम मोजण्यासाठी त्यांनी त्यांच्या समोरील काऊंटरवर रक्कम ठेवली. त्यात रक्कमेचा हिशेब करून ग्राहक महिलेला पावती दिली. मात्र सायंकाळी एकूण रकमेचा हिशेब करताना एक लाख रूपयाची रक्कम जास्तीची भरत होती. म्हणून त्यांनी रात्री साडेआठपावेतो हिशेब केला. दुसºया दिवशी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासणी केले. सीसीटीव्हीत महिला आपल्या बँगेतून रक्कम काढताना दिसली. त्यात त्यांनी बँगेतून जास्तीची रक्कम दिली असावी, अशी शक्यता लक्षात घेऊन त्या ग्राहक महिलेस बँकेत बोलविण्यात आले. त्यात त्यांना भरणा करण्यासाठी दिलेल्या रक्कमे बद्दल विचारणा करून व त्यांचा बँगेतील एकूण रक्कमेचा हिशेब जुळविला. शाखाधिकारी विनोदकुमार शर्मा यांनी संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर ते एक लाख रूपये त्या महिलेचेच असल्याचे सिद्ध झाले. ते त्या महिलेला परत करून त्यांच्या खात्यावर जमा केले. स्टेट बँकेच्या तळोदा शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकतेबद्दल कौतुक करण्यात येत आहे.