शहादा पालिका रुग्णालयात अखेर वैद्यकीय अधिका:यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:16 IST2019-11-23T13:16:05+5:302019-11-23T13:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिका रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डॉ.नीलेश वीरसिंग वसावे यांची नियुक्ती जिल्हा शल्य ...

शहादा पालिका रुग्णालयात अखेर वैद्यकीय अधिका:यांची नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पालिका रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डॉ.नीलेश वीरसिंग वसावे यांची नियुक्ती जिल्हा शल्य चिकित्सकांनी केली असून सोमवारपासून ते सेवा देणार आहेत. विशेष म्हणजे शहादेकरांची मागणी ही तज्ज्ञ वैद्यकीय अधिका:यांची नेमणूक व्हावी अशी असताना नागरिकांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी फिरले आहे.
शहादा पालिका रुग्णालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीतून गेल्या अनेक वर्षापासून शहादा ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत हा कारभार ग्रामीण रुग्णालय म्हणून कागदोपत्री सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून या रुग्णालयात वैद्यकीय अधिका:यांची जागा रिक्त असल्याने कुठलीही वैद्यकीय सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नव्हती. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनालाही संशयित आरोपींच्या अटकेनंतर वैद्यकीय चाचणीसाठी तसेच अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मयतांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यासाठी म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागत होते. याबाबत शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत येथील रिक्त जागेवर वैद्यकीय अधिका:याची नेमणूक केली आहे. डॉ.नीलेश वसावे हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर असून राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत त्यांना अकरा महिन्यांच्या करारावर वैद्यकीय सेवेत सामील करून घेतले आहे. त्यांची नियुक्ती ही मंदाणे, ता.शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून तेथून ते डेप्युटेशनवर शहादा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिका:यांच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शहादेकरांची मागणी ही तज्ज्ञ वैद्यकीय अधिका:याची असताना जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची नेमणूक करून शहादेकरांची चेष्टाच केली आहे.
शहराजवळील मोहिदा शिवारात मोठा गाजावाजा करत सुमारे सात महिन्यांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सुमारे साडेपाच एकर जागेत हे नियोजित रुग्णालय होणार असून यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध आहे. भूमिपूजन झाल्यानंतर लागलीच या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू होणे अपेक्षित असतानाही भूमिपूजनानंतर कुठलीच हालचाल झाली नसल्याने अद्यापही हे रुग्णालय कागदावरच अस्तित्वात आहे. परिणामी शहादेकरांना वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या नियमांनुसार नियोजित इमारतीचे 70 टक्के बांधकाम झाल्यानंतर आरोग्य विभाग रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ अधिका:यांसह इतर आवश्यक त्या कर्मचा:यांच्या जागा मंजूर करून भरती करतो व काही कालावधीनंतर हे बांधकाम पूर्ण झाल्यावर ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित होते. मात्र निधी उपलब्ध असताना जागा उपलब्ध असताना व भूमिपूजन झाले असतानाही ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे यास जबाबदार असणा:यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.