एसईबीसी संवर्गासाठी अर्ज करणा:यांना 24 नंतर दिलासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:14 IST2019-09-21T12:14:52+5:302019-09-21T12:14:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एसईबीसी संवर्गातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणा:या विद्याथ्र्याना 24 सप्टेंबरनंतर दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़ राज्यस्तरावर ...

एसईबीसी संवर्गासाठी अर्ज करणा:यांना 24 नंतर दिलासा !
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील एसईबीसी संवर्गातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणा:या विद्याथ्र्याना 24 सप्टेंबरनंतर दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़ राज्यस्तरावर बैठक होऊन त्यात याविषयी चर्चा होऊन समस्या सोडवणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान ही समस्या कायम असताना इतर संवर्गातील विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत़
एकीकडे एसईबीसी संवर्गातील विद्याथ्र्याना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना योजनाच दिसत नसल्याचा प्रकार सुरु असताना दुसरीकडे एससी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील मागील वर्षाच्या शिष्यवृत्ती घेतलेल्या विद्याथ्र्याना यंदा अर्ज नियमित करण्यात अडचणी येत आहेत़ महाडिबीटी या पोर्टलवर कंटीन्यूएशन ही प्रक्रियाच होत नसल्याने सुमारे आठ हजार विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्ती अर्जाचा भरणा झालेला नसल्याची माहिती समोर आली आह़े दोन्ही समस्यांवर चर्चा करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या व्हीजेएनटी विभागाचे प्रधान सचिव 24 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त स्तराच्या अधिका:यांची बैठक घेणार आहेत़ या बैठकीत या समस्येवर चर्चा होऊन कारवाई होणार असल्याची माहिती आह़े परंतू बैठकीत तोडगा न निघाल्यास याचे उत्तर मात्र मिळालेले नाही़
दरम्यान ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर एसईबीसीसह सर्वच प्रवर्गातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे पालक आणि विद्यार्थी यांनी या अडचणी मांडून माहिती दिली होती़
जिल्ह्यातून 10 हजाराच्या जवळपास कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याचे अर्ज न स्वीकृत न झाल्याने सायबर कॅफे चालकांकडे सेव्ह करण्यात आले आहेत़ येत्या चार दिवसात अर्ज अपडेट करण्याची प्रक्रिया सुरु न झाल्यास विद्याथ्र्याना पुन्हा नव्याने अर्ज करावे लागणार असल्याचेही अनेकांकडून सांगण्यात आले आह़े ग्रामीण भागात शिष्यवृत्ती अर्जासाठी व्यवस्था करण्याबतही मागणी करण्यात आली आह़े सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गेल्यावर्षी 1 हजार 355 अनुसुचित जाती तर भटके विमुक्त, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग संवर्गातील 7 हजार 487 विद्याथ्र्याना लाभ देण्यात आला आह़े यातील बहुतांश विद्यार्थी हे विद्यार्थी 11 ते पदव्युत्तर वर्गात शिक्षण घेणारे आहेत़ त्यांच्याकडून 1 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची धडपड सुरु झाली होती़ परंतू महाडीबीटी या पोर्टलवर गेल्यावर्षाच्या डाटाला कंटीन्यू करण्याची प्रक्रियाच होत नसल्याने समस्या निर्माण झाली आह़े यामुळे या विद्याथ्र्याची फिरफिर होत आह़े विभागाकडे डाटा सेव्ह असतानाही त्यांच्याकडून अर्ज भरणा होऊ शकलेला नसल्याचे समोर आले आह़े दरम्यान अनुसुचित जाती संवर्गातून आतार्पयत 199 विद्याथ्र्याचे अर्ज विभागाकडे दाखल झाल्याची माहिती आह़े तर व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी संवर्गातील विद्याथ्र्याच्या अर्जाची माहिती मात्र विभागाला अद्याप प्राप्त झालेली नाही़