इच्छुकांच्या मुलाखतींच्या सत्रामुळे अर्ज दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:18+5:302021-07-03T04:20:18+5:30

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू असल्यामुळे अद्याप एकही ...

The application was not filed due to the interview session of the aspirants | इच्छुकांच्या मुलाखतींच्या सत्रामुळे अर्ज दाखल नाही

इच्छुकांच्या मुलाखतींच्या सत्रामुळे अर्ज दाखल नाही

नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू असल्यामुळे अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. काँग्रेसच्या काल तर भाजप व सेनेच्या शुक्रवारी मुलाखती झाल्या. राष्ट्रवादीकडून शनिवारी मुलाखती होणार आहेत.

शिवसेनेतर्फे परदेशीपुऱ्यातील रामवाडीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून अवघ्या काही मतांनी गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या जागा आता नव्या दमाने लढवून जिंकून दाखवू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी उपस्थित होते.

भाजपतर्फे ११४ इच्छुक

भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ११ जिल्हा परिषदेच्या गटासाठी ४२ तर १४ पंचायत समितीच्या गणासाठी ७२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी दिली, भारतीय जनता पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्हा भाजपा जिल्हा कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांची उमेदवारीसाठी आपापले गाव, गट व गणनिहाय जिल्हा भाजपा कार्यालयाच्या परिसरात एकच शक्ती प्रदर्शन केले होते. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, यांच्यासह खासदार डॉ. हीना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या घेण्यात आल्या.

राष्ट्रवादीतर्फे आज मुलाखती

राष्ट्रवादीतर्फे शनिवारी मदर टेरेसा विद्यालयात मुलाखती होतील. जिल्हा प्रभारी अनिल गोटे, नाना महाले हे मुलाखती घेतील. सकाळी १० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी केले आहे.

Web Title: The application was not filed due to the interview session of the aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.