ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:33+5:302021-08-20T04:34:33+5:30
सारंगखेडा, ता. शहादा येथील दत्त मंदिर सामाजिक सभागृहात पंचायत समिती शहादांतर्गत स्वयंसहायता गटाचे प्रभाग स्तरीय वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन ...

ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांचा लाभ घेण्याचे आवाहन
सारंगखेडा, ता. शहादा येथील दत्त मंदिर सामाजिक सभागृहात पंचायत समिती शहादांतर्गत स्वयंसहायता गटाचे प्रभाग स्तरीय वस्तू विक्री केंद्राचे उद्घाटन जयपालसिंह रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीमार्फत महा समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवण्यात येत आहे या वेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, दत्त मंदिर संस्थांचे अध्यक्ष अंबालाल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिकन पाटील, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर, आर्थिक समावेशन उमेश अहिरराव, ग्राम विकास अधिकारी संजय मंडळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, प्रभागाच्या अध्यक्षा कविता कुवर, सचिव मीनाबाई गिरासे, तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर जगदाळे, योगेश पाटील, अशोक साळवे, किशोर बिरारे, कुणाल कानडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रावल पुढे म्हणाले पुढे म्हणाले की, महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी वस्तू पॅकिंग सोबत मार्केटिंग होणे गरजेचे आहे. या वेळी यशवंत ठाकूर यांनी महिलांना उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री व्यवस्था आणि प्रधानमंत्री बीजभांडवल योजनेची माहिती दिली. याप्रसंगी उमेश अहिरराव यांनी विविध योजनांविषयी माहिती दिली. दरम्यान, उमेद पंचायत समिती शहादा अंतर्गत उपस्थित महिलांसाठी सहा विविध वस्तूंचे बचत गटातर्फे स्टॉल लावण्यात आले होते. हे अभियान हे २ ऑक्टोबर २०२१ या कालावधीपर्यंत राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत महिला सक्षमीकरणा करीता विविध उपक्रम, नवीन स्वयंम सहायता गट, महिला ग्राम संघ, प्रभाग संघ तसेच नवीन महिला उत्पादन स्थापना करणे, बँक खाते उघडणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. महिलांची आरोग्य तपासणी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील यांनी केली. सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक ललिता पाटील तर आभार समन्वय दीपक गोसावी यांनी मानले.