तळोदा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:53+5:302021-06-19T04:20:53+5:30
लाखापूर रेव्हन्यू, कळमसरे, चिनिपाणी, प्रतापपूर- पाच, चिनोदा- एक, गाढवली, अलवान, आमलाड- एक, सोमावल खुर्द-दोन, शिर्वे-एक, पिंपरपाडा- एक, अंम्मलपाडा-एक, रामपूर-एक, ...

तळोदा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
लाखापूर रेव्हन्यू, कळमसरे, चिनिपाणी, प्रतापपूर- पाच, चिनोदा- एक, गाढवली, अलवान, आमलाड- एक, सोमावल खुर्द-दोन, शिर्वे-एक, पिंपरपाडा- एक, अंम्मलपाडा-एक, रामपूर-एक, बंधारा, मोहिदा-एक, काझीपूर, मोहिदा-दोन, चौगाव बुद्रूक-एक, बेलीपाडा-एक येथील अंगणवाडी केंद्रातील १९ अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
तसेच तुळाजा- एक, लाखापूर- एक, खरवड-दोन, खेडले, कढेल, मोड-एक, मोड-तीन (आष्टे), गुंजाळी, मोहिदा-दोन, न्यूबन-एक, प्रतापपूर- एक, प्रतापपूर-दोन, प्रतापपुर-तीन, काझीपूर, खर्डी खुर्द, केलीपाणी, बेलीपाडा-एक, शिर्वे-एक, शिर्वे-दोन, ढेकाटी, राणीपूर-तीन, चिनोदा-चार, काकलपूर, राणापूर, चौगाव खुर्द, कालीबेल-दोन, मेंढवड अंगणवाडी केंद्रातील मदतनिसाच्या २७ रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, तळोदा पंचायत समिती तळोदा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.