विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:36+5:302021-09-08T04:36:36+5:30

कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ अन्वये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी ...

Appeal to apply for the Special Honors Award | विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ अन्वये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात तसेच देशात तसेच राज्यांत पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच देशाची व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक व विधवा यांच्या पाल्यांना आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्यातून दहावी व बारावी मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांच्या रकमेचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी दहा हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ धुळे येथे संपर्क करण्याचे कळविण्यात आले आहे.

Web Title: Appeal to apply for the Special Honors Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.