रूग्णांची संख्या वाढल्याने नवापुरात चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:51 IST2020-08-20T12:51:10+5:302020-08-20T12:51:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी दोन आणि ...

रूग्णांची संख्या वाढल्याने नवापुरात चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी दोन आणि आणि बुधवारी दोन असे दोन दिवसात चार रूग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी नवापूर येथे २८, विसरवाडी येथे दोन तर खांडबारा येथे एक असे ३१ बाधित रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जाते.
विसरवाडी येथील कुंभार गल्ली परिसरातील ७१ वर्षीय पुरूष व संतोषीमाता गल्लीतील ४८ वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी कुंभार गल्लीतील बाधित व्यक्तीच्या मुलाचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. तसेच नवी दिल्ली परिसरातील ३४ वर्षीय पुरुषाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.
कुंभार गल्ली परिसरातील ७१ वर्षिय पुरूषावर सुरत येथे उपचार सुरू आहे. तर संतोषीमाता गल्लीतील पुरूष १० दिवस आधीच नंदुरबार येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे. तसेच बुधवारी बाधित आढळलेल्या रूग्णांना नंदुरबार येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब घेतले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
बाधित रूग्ण आढळलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येऊन याठिकाणी बॅरेकेट लावून परिसर सील करण्यात आलेला आहे. येथे औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. दरम्यान तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतलकुमार पाडवी, डॉ.संगीता जाधव, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, तलाठी नरेंद्र महाले, आशा गटप्रवर्तक अंजना गावीत, मनिषा वाघ आदींनी भेट दिली.