कार-डंपर अपघातात अनरदचे दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:10 IST2020-02-06T12:09:44+5:302020-02-06T12:10:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार तर दोन्ही मुले जखमी झाल्याची घटना ...

Anurad's husband killed in a car-dumper crash | कार-डंपर अपघातात अनरदचे दाम्पत्य ठार

कार-डंपर अपघातात अनरदचे दाम्पत्य ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : भरधाव डंपरने कारला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार तर दोन्ही मुले जखमी झाल्याची घटना गुजरातमधील निझर-उच्छल रस्त्यावर धारेश्वर नजीक बुधवार, ५ रोजी सकाळी घडली. गिरासे कुटूंब अनरद, ता.शहादा येथे नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. परत वापी (गुजरात) येथे नोकरीच्या ठिकाणी जात असतांना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
योगेश सरदारसिंग गिरासे (३७) व गायत्री योगेश गिरासे (३१) असे मयतांची नावे आहेत. तर मयंक (१२) व निरज (१०) अशी जखमी बालकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश गिरासे हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी अनरद येथे आले होते. गुरुवारी लग्न समारंभ आटोपून ते अनरद येथे मुक्कामी राहिल्यानंतर सकाळी ७ वाजता निझर, उच्छलमार्गे ते वापी येथे जात होते. निझर ते उच्छल दरम्यान धारेश्वर मंदीरालगत त्यांच्या कारला (क्रमांक एमएच ३९-जे १४१२) समोरून येणाऱ्या डंपरने (क्रमांक जीजे २१ व्ही ४४२८) जबर धडक दिली. यात कारचा संपुर्ण चक्काचूर झाला. स्वत: योगेश गिरासे हे कार चालवत होते. त्यांच्या शेजारी पत्नी गायत्री या बसल्या होत्या. त्यामुळे त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले मयंक व निरज हे जखर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी कारचा पत्रा कापून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. निझर येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दोन्ही मुलांवर शहादा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी सायंकाळी गिरासे दाम्पत्यावर अनरद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांची सोबतच अंत्ययात्रा निघाल्याने ग्रामस्थ व नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. योगेश गिरासे हे वापी येथे खाजगी कंपनीत नोकरीस होते.

Web Title: Anurad's husband killed in a car-dumper crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.