शहाद्यात आणखी एकजण कोरोना पॉङिाटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या आठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:28 IST2020-04-24T18:25:15+5:302020-04-24T18:28:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील मयत कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 23 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. ...

शहाद्यात आणखी एकजण कोरोना पॉङिाटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या आठ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील मयत कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 23 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या आठ झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून सात जणांवर उपचार सुरू आहेत.
शहादा येथील कोरोना बाधीत युवा व्यावसायिकांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कातील 29 व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एकाचा अहवाल पॉङिाटिव्ह आला आहे. हा युवक 23 वर्षीय असून मयत रुग्णाच्या परिसरातच राहणार आहे. आता या युवकाच्या संपर्कातील लोकांची माहिती काढण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. यामुळे शहाद्यातील रुग्णांची संख्या तीन झाली असून जिल्ह्यातील रुग्णसंख्या 8 झाली आहे. दरम्यान आणखी 28 अहवालांची प्रतिक्षा कायम आहे.
जिल्ह्यात आतार्पयत एकुण 257 जणांची तपासणी करण्यात आली असून 153 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही 96 अहवालांची प्रतिक्षा कायम आहे.