नंदुरबार जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:43 IST2020-05-03T21:42:59+5:302020-05-03T21:43:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नटावद, ता.नंदुरबार येथील ३१ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता १९ ...

Another corona bite in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाची बाधा

नंदुरबार जिल्ह्यात आणखी एकाला कोरोनाची बाधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नटावद, ता.नंदुरबार येथील ३१ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता १९ झाली आहे. दरम्यान, हा रुग्ण सुरुवातीपासूनच क्वॉरंटाईन असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असल्याने सोमवारपासून व्यवहार काही अंशी सुरळीत होणार आहे.
रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये नटावद येथील ३१ वर्षीय युवकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. या युवकावर आधीपासूनच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. संबधित युवकाचा अहवाला पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय पथक तातडीने नटावद येथे दाखल झाले असून येथील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित झाला आहे़ त्याठिकाणी उपाययोजनांना सुरुवात झाली आहे़ युवकाचा अहवाल पाझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे़

Web Title: Another corona bite in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.