खाजगी रूग्णालयाच्या चुकीच्या अहवालाने मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:08 IST2020-08-07T13:08:49+5:302020-08-07T13:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील ४० वर्षीय महिलेची अचानक प्रकृती खालावल्याने शहादा येथील खासगी रूग्णालयात ...

खाजगी रूग्णालयाच्या चुकीच्या अहवालाने मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील ४० वर्षीय महिलेची अचानक प्रकृती खालावल्याने शहादा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रूग्णालयात या ४० वर्षीय महिलेचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्याने तीला कोरोना असल्याच्या चुकीच्या माहितीमुळे कुटुंबातील करोनाबाधित रूग्णाची शोधाशोध झाली. दरम्यान, कुटुंबातील १० जणांचा स्वॅब घेता असला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत असे की, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील एका ४० वर्षीय महिलेला हृद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना शहादा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या प्रवास इतिहासाची माहिती विचारल्यावर कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कुटुंबियांना दिल्यामुळे त्यांना धक्का बसला. या वेळी अंत्यविधीसाठी पूर्ण खबरदारी म्हणून पीपी कीट घालण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या कुटूंबियांनी पीपी कीट परिधान करून गावात अंत्यविधीसाठी आणल्यावर गावात अफवेला पेव फुटल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे त्यांचा नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मयत महिलेच्या कुटुंबातील एकूण १० सदस्यांचा स्वब घेण्यात आला व तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने मयत महिलेच्या नातेवाईकांना खाजगी रूग्णालयात दिलेल्या अर्धवट आणि चुकीच्या माहितीमुळे कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एका चुकीच्या माहितीमुळे संपूर्ण गावाची धाक धुक वाढल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मृत्यू झालेली ४० वर्षीय महिला कोरोना संशयित असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना देण्यात आली होती. त्यासाठी कुटुंबातील १० जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामुळे गावात धाक धुक वाढली होती. दरम्यान या १० जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.