अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST2021-08-02T04:11:40+5:302021-08-02T04:11:40+5:30
शहादा येथील लाडकोरबाई प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रम घेण्यात ...

अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
शहादा येथील लाडकोरबाई प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मायाबाई जोहरी होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन उपस्थित राहून लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षा मायाबाई जोहरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार सुनयना निकम यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षिका व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन उपस्थिती नोंदविली. नंदुरबार येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.ए. मंगळे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून एस.पी. पाटील उपस्थित होते. त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची तर पी.एस. पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन यु.पी. पाटील तर आभार डी.बी. पावरा यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- पी.के. पाटील विद्यालय, नंदुरबार
नंदुरबार शहरातील पी.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी संस्थेचे सचिव रूपेश चौधरी, मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ व प्राध्यापक गणेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांनी लोकमान्य टिळकांचे बालपण व जीवनकार्यविषयी माहिती दिली. संस्थेचे सचिव रूपेश चौधरी यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील कार्यातील विविध पैलूंद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुरेंद्र पाटील, अनिल चौधरी, विश्वास गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, छाया मोरे, उज्ज्वला चौरे, नितीन साळी, अमोल भदाणे, जितेंद्र चौधरी, शेखर पाटील, रवींद्र चौधरी, सुधाकर ठाकूर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.