परिचारिकेशी अंगलट, एकाविरुद्ध अॅट्रासिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:28 IST2019-09-11T11:28:21+5:302019-09-11T11:28:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रुग्णवाहिकेत आरोग्य सेविका महिलेशी अंगलट करणा:या कर्मचा:याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल ...

परिचारिकेशी अंगलट, एकाविरुद्ध अॅट्रासिटी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रुग्णवाहिकेत आरोग्य सेविका महिलेशी अंगलट करणा:या कर्मचा:याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
सुलवाडा आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका महिला व तेथेच काम करणारा व्ही.टी.लामगे हे रुग्णवाहिकेद्वारे रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले होते. रुग्ण दाखल करून परत जात असतांना नंदुरबार ते पातोंडा रस्त्यावर लामगे यांनी रुग्णवाहिका थांबवून महिलेशी अंगलट करण्याचा प्रय} केला. यामुळे महिलेने त्याला विरोध केला. नंतर म्हसावद येथे जावून महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून व्ही.टी. लामगे यांच्याविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहर पोलिसात शून्य क्रमांकाने तो वर्ग करण्यात आला. तपास उपविभागीय अधिकारी रमेश पवार करीत आहे.