सोनवद तर्फे शहादा ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी सेविकांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:42+5:302021-03-18T04:30:42+5:30
सरपंच राजेंद्र वाघ व उपसरपंच पुंडलिक पाटील यांच्या हस्ते सेविकांना कोविड कीट आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. ...

सोनवद तर्फे शहादा ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी सेविकांचा गाैरव
सरपंच राजेंद्र वाघ व उपसरपंच पुंडलिक पाटील यांच्या हस्ते सेविकांना कोविड कीट आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुर्हे, साईनाथ आरगडे, ग्रामसेवक अनिल ठाकरे , जगदीश राजपूत व कहाटुळ गटातील पर्यवेक्षका अंजना मोरे उपस्थित होत्या. गटातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोरोना व पोषण अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल हा गाैरव करण्यात आला. प्रसंगी आदर्श अंगणवाडी सेविका भारती देशमुख यांचा विशेष गाैरव करण्यात आला. कवठळ येथील सरपंच रामदास मोरे व ग्रामसेवक अनिल ठाकरे यांचाही कार्यक्रमात गाैरव करण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, कोरोना हरवण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती महत्त्वाची आहे . अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम मोठे असून ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कोरोना विषयी जनजागृती करीत आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जोखीम पत्करून काम करावे लागते. या गौरवामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रामीण भागात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.