अंगणवाडी सेविका बबीता पाडवी यांच्या लसीकरण जनजागृतीचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:00+5:302021-05-13T04:31:00+5:30

सध्या सर्वत्र कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र गैरसमजुतीमुळे अनेक जण लसीकरणापासून लांब पळत आहेत. ही ...

Anganwadi worker Babita Padvi's appreciation for vaccination awareness | अंगणवाडी सेविका बबीता पाडवी यांच्या लसीकरण जनजागृतीचे कौतुक

अंगणवाडी सेविका बबीता पाडवी यांच्या लसीकरण जनजागृतीचे कौतुक

सध्या सर्वत्र कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र गैरसमजुतीमुळे अनेक जण लसीकरणापासून लांब पळत आहेत. ही बाब हेरुन डोंगरपाडा लोय येथील अंगणवाडी सेविका बबीता पाडवी या अनोख्या पद्धतीने लसीकरणाबाबत जनजागृती करून प्रबोधन करीत आहेत. ग्रामीण भागात ढोल वाद्याच्या सहाय्याने ध्वनिक्षेपकावरून लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहे. त्यांच्या या जनजागृती अभियानाला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक ग्रामस्थ लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बबीता पाडवी या ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी आदिवासी बोली भाषेतील लोककलेच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहेत. त्यांच्या या जनजागृती अभियानाला सरपंच, ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले असून ग्रामीण भागातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Anganwadi worker Babita Padvi's appreciation for vaccination awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.