आणि विद्यार्थ्यांनी मारल्या बसच्या खिडकीतून उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 11:54 IST2020-01-27T11:54:08+5:302020-01-27T11:54:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुुरबार : रस्ता कामासाठी खोदून ठेवलेल्या एका बाजुला एस.टी.बसचे चाक उतरल्याने बसचा मोठा अपघात टळला. भितीपोटी ...

And the students jumped out of the bus window | आणि विद्यार्थ्यांनी मारल्या बसच्या खिडकीतून उड्या

आणि विद्यार्थ्यांनी मारल्या बसच्या खिडकीतून उड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुुरबार : रस्ता कामासाठी खोदून ठेवलेल्या एका बाजुला एस.टी.बसचे चाक उतरल्याने बसचा मोठा अपघात टळला. भितीपोटी बसमधील विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. दुसऱ्या बाजुने विद्यार्थी व प्रवाशांनी बस उलटू नये म्हणून आधार दिल्याची घटना शहादा-मंदाणा रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी घडली.
शहादा-शहाणा बस (क्रमांक एमएच १४ बीटी १३५६) शहाणाकडे जात असतांना कर्जोत गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ३० ते ४० प्रवासी होते. विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. तीन चार फूट खोल भागात बसचे चाक उतरल्याने बसची एक बाजू पुर्णपणे झुकली. त्यामुळे खिडकी आणि आपत्कालीन दरवाजातून विद्यार्थी व प्रवाशांनी उड्या मारल्या. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

Web Title: And the students jumped out of the bus window