ऐन दिवाळीत कांदा रडवतोय..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:48 IST2017-10-14T13:47:44+5:302017-10-14T13:48:05+5:30
सामान्यांना फटका : कांदा आवक वाढूनही किरकोळ बाजारात चढाव

ऐन दिवाळीत कांदा रडवतोय..
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जीवनावश्यक वर्गात मोडला जाणारा कांदा ऐन दिवाळीत महाग झाला आह़े बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने कांदा किरकोळ बाजारात 35 रूपये किलो दरार्पयत विक्री होत असल्याने सामान्य हैराण झाले आह़े
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात शनिमांडळ, तिलाली, इंद्रहट्टीसह विविध गावे आणि शहादा तालुक्यात काही ठिकाणी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात कांदा उत्पादन घेतले जात़े विहिर किंवा कृषीपंपांवर जगवला जाणारा कांदा यंदा अल्प क्षेत्रात लागवड करण्यात आला होता़ अद्याप खरीप हंगामात लागवड केलेल्या कांद्याचे पूर्णपणे उत्पादन आलेले नसल्याने बाजारात साठवून ठेवलेला कांदा येत आह़े साठवलेल्या कांद्यामुळे यंदा बहुतांश शेतक:यांची दिवाळी ही चांगल्या स्थितीत जाणार असल्याने समाधान व्यक्त होत आह़े दुसरीकडे मात्र कांदा मिळत नसल्याने विविध हॉटेल व्यावसायिक मात्र संकटात सापडले आहेत़ दिवाळी हा ग्राहकांचा सगळ्यात मोठा हंगाम असल्याने कांदा आवक करून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आह़े दीड महिन्यानंतर चांगला आणि परिपक्व कांदा बाजारात येणार असल्याने तोवर बाजारात कांदा तुटवडा जाणवणार आह़े येत्या नोव्हेंबर मध्यात शेतातून कांदा बाजारात येणार आह़े