आमलाड गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:38+5:302021-04-11T04:29:38+5:30
तळोदा तालुक्यातील आमलाड येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून त्यांच्या संपर्कातून इतरांना लागण होणार नाही व नव्याने रुग्ण वाढू ...

आमलाड गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित
तळोदा तालुक्यातील आमलाड येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून त्यांच्या संपर्कातून इतरांना लागण होणार नाही व नव्याने रुग्ण वाढू नये म्हणून खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी आमलाड गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून या क्षेत्रात जाण्या-येण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात २२ एप्रिल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता सनियंत्रण अधिकारी म्हणून पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात येत असून यासाठी सरपंच सदाशिव ठाकरे, उपसरपंच डॉ. प्रकाश पाटील, ग्रामसेवक वाय.एस. सूर्यवंशी, पोलीस पाटील राजाराम पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुमित वाणी, ग्रामरक्षक दलातील धरम ठाकरे, पावबा ठाकरे, अंबालाल पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत.