आमलाड-बोरद रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:58+5:302021-04-13T04:28:58+5:30

आमलाड ते बोरद रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, तर गावांजवळ काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हे काँक्रिटीकरण उखडले असून, त्यातील ...

The Amlad-Borad road is fatal | आमलाड-बोरद रस्ता ठरतोय जीवघेणा

आमलाड-बोरद रस्ता ठरतोय जीवघेणा

आमलाड ते बोरद रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, तर गावांजवळ काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. हे काँक्रिटीकरण उखडले असून, त्यातील लोखंडी सळ्या वर आल्या आहेत. ११ एप्रिल रोजी मोड गावाजवळ सायंकाळी एक मोटारसायकलस्वार या सळ्यांमध्ये अडकला. त्यात मोटारसायकलवरील दोघेजण खाली कोसळून जखमी झाले. याठिकाणी उपस्थित असलेले दीपक चव्हाण, गणेश सोनार, जीवन नवले, आदींनी लोखंडी सळ्यांमध्ये अडकलेली मोटारसायकल काढून दोघांना रस्त्याच्या बाजूला केले. याचवेळी समोरून किंवा मागून एखादे वाहन आले असते तर मोठा अपघात घडला असता. याठिकाणी दुसरा अपघात घडू नये म्हणून ग्रामस्थांनी लोखंडी सळ्या कापल्या व बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष जगताप यांना कळवून त्यांच्या व्हाॅटस्‌ॲपवर फोटोही टाकले. त्यावर संबंधित ठेकेदाराला दुरुस्तीचे काम तातडीने करण्यास सांगतो, असे जगताप यांनी सांगितले.

Web Title: The Amlad-Borad road is fatal