‘पाहुणचाराच्या अमिषाने’ तिघींनी केली थेट 70 किलोमीटरची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:54 IST2019-06-22T11:54:32+5:302019-06-22T11:54:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मलोणी परिसरातून बेपत्ता युवतीसह दोघा बालिकांना सुखरुप परत आणण्यात पोलीसांना यश आले आह़े 14 ...

‘पाहुणचाराच्या अमिषाने’ तिघींनी केली थेट 70 किलोमीटरची पायपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मलोणी परिसरातून बेपत्ता युवतीसह दोघा बालिकांना सुखरुप परत आणण्यात पोलीसांना यश आले आह़े 14 जून पासून बेपत्ता असलेल्या तिघी मांडवी ता़ धडगाव येथे आढळून आल्या़ शहादा ते धडगाव हे 70 किलोमीटरचे अंतर पायी चालून गेलेल्या तिघींना दोघा युवकांनी पाहुणचाराचे अमिष दिले होत़े
धडगाव तालुक्यातील तीन कुटूंबे मजूरीसाठी मलोणी येथे आले आहेत़ 14 जून रोजी तिन्ही कुटूंबातील 10 व 12 वर्षीय बालिका आणि 15 वर्षीय युवती अचानक बेपत्ता झाल्या होत्या़ यामुळे शहादा परिसरात खळबळ उडाली होती़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तिघींचा शोध सुरु केला होता़ दरम्यान तीन मुली धडगावकडे गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ पोलीसांनी शोध घेतला असता, गुरुवारी सकाळी ‘त्या’ मांडवी येथून मिळून आल्या़ त्यांना दुपारी शहादा येथे आणून पालकांकडे सोपवण्यात आल़े तिघींना निलेश काल्या पाडवी आणि कलम्या वज:या पराडके या दोघांनीही पाहुणचाराचे अमिष दाखवून नेले होत़े तिघी 14 रोजी रात्री पायपीट करत धडगाव तालुक्यात पोहोचल्या होत्या़ तेथून ठिकठिकाणी नातेवाईकांकडे पायीच जावून चार दिवस थांबल्यानंतर त्या मांडवी येथे आल्या होत्या़ तिघींची नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली असून कलम्या पराडके यास अटक करण्यात आली आह़े दुसरा संशयित निलेश पाडवी याचा पोलीस शोध घेत आहेत़ पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बी़डी़शिंदे, राजेश पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली़