ऑनलाईन प्रणालीमुळे आता सहज आणि लवकर उपलब्ध होईल रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:36+5:302021-05-20T04:32:36+5:30

www.ndbcovidinfo.com या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घराजवळील रुग्णवाहिकेची स्थिती लक्षात ...

Ambulances will now be easily and quickly available due to the online system | ऑनलाईन प्रणालीमुळे आता सहज आणि लवकर उपलब्ध होईल रुग्णवाहिका

ऑनलाईन प्रणालीमुळे आता सहज आणि लवकर उपलब्ध होईल रुग्णवाहिका

www.ndbcovidinfo.com या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घराजवळील रुग्णवाहिकेची स्थिती लक्षात येऊ शकेल. अशा रुग्णवाहिकेवर क्लिक केल्यास रुग्णवाहिका क्रमांक, वाहनचालकाचे नाव व मोबाईल क्रमांक दर्शविला जाईल. वाहनचालकाशी थेट संपर्क करून रुग्णवाहिकेची सुविधा घेता येईल. संकेतस्थळावर रुग्णवाहिकेचा शोध घेताना

रुग्णवाहिका क्रमांक किंवा परिसराचा पर्यायही निवडण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णवाहिकेसाठी १०२, १०८, किंवा नियंत्रण कक्षातील क्रमांकावरदेखील रुग्णवाहिकेसाठी संपर्क करता येईल. या सर्व रुग्णवाहिकांचे केवळ कोविड-१९, सर्व रुग्णांसाठी, गरोदर माता व शिशू आणि शववाहिका अशा चार प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. संबंधित रुग्णवाहिका त्याच कामांसाठी उपयोगात आणली जाणार असून लवकरच त्यानुसार शोधण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन यांनी सांगितले.

Web Title: Ambulances will now be easily and quickly available due to the online system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.