११ ग्रामपंचायतींनी घेतल्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:16 IST2020-09-08T12:16:08+5:302020-09-08T12:16:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहिकेची सुविधा ...

Ambulances for health services taken by 11 Gram Panchayats | ११ ग्रामपंचायतींनी घेतल्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका

११ ग्रामपंचायतींनी घेतल्या आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांना स्वॅब देण्यासाठी तसेच स्वॅब पोहचविण्यासाठी, कोविड सेंटर मधुन उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णाना घरी पोहचविण्यासाठी, तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्याची ने-आण इत्यादी कामासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने यासाठी पुढाकार घेतला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुग्णवाहिकेसाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास परवानगी दिली आहे. यात सारंगखेडा, म्हसावद, मंदाणा, रनाळा, खोंडामळी, विसरवाडी, खांडबारा, अक्कलकुवा, खापर, मोलगी, प्रकाशा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ही सर्व वाहने भाडे तत्वावर घेण्यात आली आहेत.
वाहनांमध्ये आवश्यक ते बदल करुन हे वाहन दोन दिवसात प्रत्यक्ष उपयोगात आणले जाणार आहे. या वाहनातील वाहनचालकांस पीपीई किट त्याचबरोबर आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा केला जाईल.
हे वाहन जरी ग्रामपंचायतीच्या खचार्तून लावली जाणार असले तरीही त्यावर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण राहील. आवश्यकतेनुसार तातडीच्या प्रसंगी यावाहनाचा उपयोग करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व परिसरातील इतर गावातील बाधित व्यक्तींसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
कोरोनासाठी सेवा...
या रुग्णवाहिकेचा उपयोग हा कोरोना रुग्णांसाठी मुख्यत: होणार आहे. त्यामुळे ग्रामिण भागात रुग्णवाहिका न मिळण्यामुळे होणारा संताप आणि नाराजी यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सर्वच बाजारपेठेच्या गावांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्याने ते सोयीचे ठरणार आहे.
 

Web Title: Ambulances for health services taken by 11 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.