रुग्णवाहिकाचालकच वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:15 IST2020-07-08T12:15:48+5:302020-07-08T12:15:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : कोरोनाच्या प्रादुर्भावात २४ तास सेवा बजावणारी अटल आरोग्य वाहिनी तथा १०८ रूग्णवाहिकेवरील चालक व ...

Ambulance driver deprived of salary | रुग्णवाहिकाचालकच वेतनापासून वंचित

रुग्णवाहिकाचालकच वेतनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : कोरोनाच्या प्रादुर्भावात २४ तास सेवा बजावणारी अटल आरोग्य वाहिनी तथा १०८ रूग्णवाहिकेवरील चालक व डॉक्टरांचे उल्लेखनिय कार्य असतानादेखील चालक व डॉक्टराना मे व जून या दोन महिन्याचे मानधन मिळाले नसून, ते मानधनच्या प्रतिक्षेत.
नंदुरबार जिल्हात सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करित आहेत. यात डॉक्टर, नर्स, पोलीस व इतर आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्याचबरोबर अटल आरोग्य वाहिनी १०८ आश्रम शाळे करिता दिलेली रूग्णवाहिका आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोना पेशंटसाठी वापरली जात आहे.
१०८ रूग्णवाहिकेवरील चालक व डॉक्टर हे स्वता:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाना योग्य सेवा देण्याचे कर्तव्य पार पाडत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आम्ही खापर येथील क्वॉरंटाईन सेंटरला काम करीत आहोत. या वेळी आम्ही शहराबाहेरून व गुजरात, मुंबई, पुणे, नाशिक येथून आलेल्या व्यक्तीस क्वॉरंटाईन सेंटरला दाखल करणे व त्यानंतर त्यांना घरी सोडणे तसेच कोरोनाचे लक्षणे असतील तर त्या रूग्णास जिल्हा रूग्णालयला स्वॅब देण्यासाठी घेऊन जात आहोत. गेल्या काही महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भविष्यात कोरोनाचे पेशंट वाढण्याचा मोठा धोका आहे. परंतु या संकट काळातदेखील १०८ रूग्णवाहिकेवरील डॉक्टर व चालक प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत. आम्ही जेव्हा पी.पी.ई. कीट घालत असतो तेव्हा आम्हाला खुप त्रास सहन करावा लागत असतो. उष्ण, वेळेवर जेवण नाही, पाणी नाही, पगार वेळेवर नाही हे सर्व सहन करून सेवा देण्याच काम करत आहोत.
तळोदा प्रकल्पातील अटल आरोग्य रूग्णवाहिन्या व अक्कलकुवा येथील ग्रामीण रूग्णालयातील रूग्णवाहिका याठिकाणी उत्तम सेवा देत आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना ने-आण करण्यासाठीसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यासाठीदेखील त्यांचा वापर केला जातो. तसेच कोरोना मुक्त व्यक्तिस घरी सोडण्यासाठीही २४ तास कार्यरत आहेत.
डॉ.उमेश साने, डॉ स्वपनील मालखडे यांच्या मार्गदर्शनाखाली अटल आरोग्य वाहिनीवर काम करणारे डॉ.रमेश वसावे व चालक सागर वळवी, सायसिंग वसावे, सुनील पाडवी हे खापर येथील क्वॉरंटाईन सेंटवर काम करत आहेत.

Web Title: Ambulance driver deprived of salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.