नंदुरबारात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:49 IST2020-12-19T10:49:16+5:302020-12-19T10:49:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील डी.आर. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय ते जी.टी. पाटील महाविद्यालयातील २००३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा ...

नंदुरबारात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील डी.आर. हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय ते जी.टी. पाटील महाविद्यालयातील २००३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा येथे झाला. महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेले मित्र १८ वर्षांनंतर एकत्र आल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले होते.
नंदुरबार शहरातील जी.टी. पाटील महाविद्यालयात २००२-२००३ वर्षी कला विभागातील व डी.आर. हायस्कूलमधील माजी विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळले. डी.आर. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असताना काही मित्र जी.टी. पाटील महाविद्यालयात व काही महिला कॉलेजला व काही तळोदा येथे एम.एस.डब्ल्यू.साठी गेलेले मित्र तब्बल १८ वर्षांनी व्हॉट्सॲपच्या व फेसबुकच्या माध्यमातून एकत्र झाले. महाविद्यालयात असताना मित्राशिवाय दिवस न जाणारे, दिवसभर मित्रांमध्ये रमणारे मित्र-मैत्रिणी आपापल्या व्यवसायात गुंतल्यामुळे एकमेकांची भेट दुरापास्त झाली. कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आला. या नऊ महिन्यांच्या कालावधीत नातेसंबंधांना उजाळा मिळाला. त्यात मिळालेल्या गत आठवणी आठवत सर्व मित्र फेसबुक, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून एकत्र येत स्नेहमिलन करण्याचे ठरविले. या मित्रांना तब्बल १७ वर्षांनी भेटण्याचा योग जुळून आला. या मेळाव्यासाठी नंदुरबार, शिरपूर, अंबरनाथ, कल्याण, पुणे येथून सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र येत गप्पांचा फड जमला. यावेळी भविष्यात एकत्र येत गुरुजनांचा सत्कार करण्याचा मानस करीत सामाजिक कार्य करण्याचा संकल्प घेत एकमेकांचा निरोप घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांचे पालन करीत स्नेहमेळावा घेण्यात आला.
प्रास्ताविक विजय बडगुजर व नामदेव सूर्यवंशी यांनी केले. यावेळी महेश पाटील, अविनाश पाटील, राकेश सोनवणे, संजय वळवी, श्रीराम बोरसे, विजय बडगुजर, नामदेव सूर्यवंशी, मनोहर पाटील, गणेश तांबोळी, संदीप मोरे, विलास कदमबांडे, हंसराज पाटील, राजकिरण पाटील, राहुल वसावे, रामचंद्र भावसार, बादशाह पिंजारी, ज्योती पवार, दीप्ती पटेल, जयश्री कोळी, श्वेता शिंपी, अस्मिता रघुवंशी-सोनवणे, जयश्री कानडे आदी उपस्थित होते.