पर्यायी रस्ताही चिखलात फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:56 IST2019-07-29T12:56:39+5:302019-07-29T12:56:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोळदा ते खेतिया रस्त्याचे काम रखडल्याने पावसाळ्यात वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...

The alternative road also got stuck in the mud | पर्यायी रस्ताही चिखलात फसला

पर्यायी रस्ताही चिखलात फसला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोळदा ते खेतिया रस्त्याचे काम रखडल्याने पावसाळ्यात वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. डामरखेडा ते लांबोळा दरम्यान पर्यायी रस्ताही सुस्थित नसल्याने चिखलात वाहने फसत आहेत. यामुळे  वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम करणा:या संबधीत ठेकेदाराला जिल्हाधिका:यांनी समज द्यावी अशी मागणी होत आहे. 
विसरवाडी-सेंधवा महामार्गाचे कोळदा ते खेतिया दरम्यानचे काम गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहे. सध्या डामरखेडा ते लांबोळा र्पयतचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणी पर्यायी रस्ता असला तरी त्यात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. संततधार पावसामुळे चिखलाचेही साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी जड वाहने फसत असल्याने वाहतुकीचा वारंवार  खोळंबा होत आहे. ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहनांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ आहे. त्यातच पर्यायी रस्त्याची वाट लागल्याने दिवसातून अनेक वेळा वाहतूक खोळंबा होत आहे. 
परिणामी चारचाकी वाहन चालकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर अनेक वाहने थेट खड्डयात पडत  आहेत. 
काही वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून प्रकाशाहून काथर्दा, तिखोरा मार्गे शहादा या रस्त्याचा वापर करीत आहेत. आधीच हा रस्ता सिंगल त्यात वाहनांचा मोठय़ा प्रमाणावर वापर वाढल्याने या रस्त्याची देखील वाट लागली आहे. या रस्त्यावरील गावकरी देखील हैराण झाले आहेत. या रस्त्यावरही वारंवार वाहतूक खोळंबा होत आहे.
जिल्हाधिका:यांनी काम करणा:या संबधीत कंपनीच्या अधिका:यांना व ठेकेदारांना समज देवून पर्यायी रस्ता विस्तृत करावा तसेच कामाला गती देण्याच्या सुचना कराव्या अशी मागणी वाहन चालक तसेच या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.    
 

Web Title: The alternative road also got stuck in the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.