गांधीजींच्या पत्रकारितेचेही मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:22 IST2020-02-03T12:21:48+5:302020-02-03T12:22:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : म.गांधी यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्रकारितेचेही मोठे योगदान होते असे प्रतिपादन गांधी अभ्यासक डॉ.विश्वास पाटील ...

गांधीजींच्या पत्रकारितेचेही मोठे योगदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : म.गांधी यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्रकारितेचेही मोठे योगदान होते असे प्रतिपादन गांधी अभ्यासक डॉ.विश्वास पाटील यांनी येथे बोलतांना व्यक्त केले.
टिळक जिल्हा वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.विश्वास पाटील यांनी ‘महात्मा गांधी आणि पत्रकारिता’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अॅड.रमण शाह होते. साहित्यिक डॉ.पीतांबर सरोदे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांनी आपल्या व्यासंगपूर्ण व्याख्यानाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या वेळी शल्यचिकित्सक डॉ.शिरीष शिंदे, कार्यवाहक पीतांबर सरोदे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्रकुमार गावीत यांचे अभिष्टचिंतन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका विद्या बाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा.ज्योती महंत यांनी वैष्णव जन तो तेणे कहिये हे भजन म्हटले.माजी प्राचार्य अॅड.पी.एन. देशपांडे, बी.एस. पाटील, अ.भा. टेंभेकर, मुकूंद गुजराथी, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य निंबाजीराव बागुल, अॅड,केतन शाह, कैलास मराठे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.