लोणचे बनविण्यासाठी महिलांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:02+5:302021-06-16T04:41:02+5:30
लोणचे बनविण्यासाठी साहित्य कैरी कापण्याची मजुरी प्रतिकिलो १० रुपये असून, त्यासाठी हळद, मोहरी डाळ, मीठ, शेंगदाणा किंवा करडई तेल, ...

लोणचे बनविण्यासाठी महिलांची लगबग
लोणचे बनविण्यासाठी साहित्य
कैरी कापण्याची मजुरी प्रतिकिलो १० रुपये असून, त्यासाठी हळद, मोहरी डाळ, मीठ, शेंगदाणा किंवा करडई तेल, मोहरी, हिंग, मेथ्या, लवंग, घरी तयार केलेले लाल तिखट, आदी साहित्याचा वापर करून कैऱ्यांचे तिखट लोणचे तयार होते.
येणारा खर्च
कैऱ्या ३० ते ४० रुपये किलो दर, शेंगदाणा तेल २६० रुपये किलो, मोहरी ४० रु. मोहरी दाळ १४० रु. हिंग डबी ४० रु. लाल तिखट २६० रु. मेथी डाळ २०० रु. लवंग १० रुपये तोळा, मिरी, बडीशेप १०० रु. हळद, मीठ २१ रु. असे दर असल्याने काही प्रमाणात लोणच्यांच्या साहित्याचे दर वाढले आहेत.
मागील वर्षी कोरोना व लॉकडाऊन आणि कोविडची भीती असल्याने आम्ही लोणचे केले नव्हते; पण या वर्षी आम्ही सर्व काळजी घेतली. घरगुती मसाले साहित्य वापरून पाच किलो कैऱ्यांचे चटपटीत असे लोणचे तयार केले आहे. घरगुती लोणच्याची चव ही विकतच्या लोणच्यापेक्षा भारी असते.
- अश्विनी पाटील, गृहिणी