चिनोदा परिसरात चारा साठवणुकीसाठी पशुपालकांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:29+5:302021-06-09T04:38:29+5:30
रब्बी हंगामातील उन्हाळी ज्वारी, गहू, भुईमूग, बाजरी, टरबूज आदी पिकांची काढणी झाल्यानंतर आपल्या पशुधनासाठी वर्षभराचा चारा साठवला जातो. शेतकऱ्यांचा ...

चिनोदा परिसरात चारा साठवणुकीसाठी पशुपालकांची लगबग
रब्बी हंगामातील उन्हाळी ज्वारी, गहू, भुईमूग, बाजरी, टरबूज आदी पिकांची काढणी झाल्यानंतर आपल्या पशुधनासाठी वर्षभराचा चारा साठवला जातो. शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय म्हणून पशुपालनासाठी चाऱ्याची योग्य साठवणूक होणे गरजेचे असते. जसजसा उन्हाळा संपू लागला आहे, तसतशी पावसाची शक्यताही वाढू लागली आहे. यामुळे सध्या बळीराजा चारा साठवण्यासाठी धावपळ करीत आहे. पावसाचे आगमन होण्यापूर्वी शेतकरी शेतात घाम गाळून शेती मशागतीचे काम पूर्ण करून घेतो. तसेच पावसाने हा चारा वाया जाऊन नुकसान होऊ नये किंवा खराब होऊ नये यासाठी शेतकरी आपल्या गोठ्यात चाऱ्याची साठवण करतात. चाऱ्याचा साठा ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात येते. तसेच जिथे चारा दीर्घकाळ टिकू शकेल अशा जागेचीही दुरुस्ती केली जाते. चारा ठेवण्यापूर्वी संपूर्ण जागेची साफसफाई करून मग चारा ठेवला जातो. यासाठी शेतकरी आपली शेतीची पूर्वमशागतीचे कामे करून आपल्या जनावरांसाठी चाऱ्याच्या साठवणुकीसाठी धावपळ करीत असल्याचे चित्र चिनोदासह परिसरात दिसून येत आहे.