खासगी दवाखान्यांना कोरोना उपचाराची परवानगी द्या- रघुवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST2021-04-21T04:30:47+5:302021-04-21T04:30:47+5:30
नंदुरबार : जे दवाखाने कोविड रुग्णांवर उपचार करीत असतील त्या सर्व दवाखान्यांना सरसकटपणे परवानगी द्यावी अशी मागणी माजी आमदार ...

खासगी दवाखान्यांना कोरोना उपचाराची परवानगी द्या- रघुवंशी
नंदुरबार : जे दवाखाने कोविड रुग्णांवर उपचार करीत असतील त्या सर्व दवाखान्यांना सरसकटपणे परवानगी द्यावी अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे ज्या दवाखान्यांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली असेल त्याच दवाखान्यामधील रुग्णांना जिल्हा प्रशासनातर्फे रेमडेसिविर इंजेक्शन पुरवले जातील हा नियम एकप्रकारे विना परवानगीने उपचार करणाऱ्या रुग्णांवरती अन्याय आहे. विनापरवानगीचे दवाखाने जरी असले तरी ते कोविड रुग्णांवर उपचार करीत आहेत ही वस्तुस्थिती आहे. जे दवाखाने कोविड रुग्णांवर उपचार करीत असतील त्या सर्व दवाखान्यांना सरसकटपणे परवानगी द्यावी. म्हणजेच त्या दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होणार नाहीत. तातडीने या दवाखान्यांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी द्यावी तसेच रेमडेसिविर इंजेक्शनसुद्धा उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी या पत्रात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे.