डेंग्यू विषयावर आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:21 IST2019-11-26T12:20:55+5:302019-11-26T12:21:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डेंग्यूच्या प्रश्नावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप झाले. पालिका उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी ...

Allegations on Dengue issue | डेंग्यू विषयावर आरोप-प्रत्यारोप

डेंग्यू विषयावर आरोप-प्रत्यारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डेंग्यूच्या प्रश्नावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आरोप-प्रत्यारोप झाले. पालिका उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला.  12 विषयांना मंजुरी देण्यात आली. 
पालिकेची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष परवेजखान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डेंग्यू आजारावर विरोधकांनी सत्ताधारींना कोंडीत पकडण्याचा प्रय} केला. परंतु इतर शहरांच्या तुलनेत नंदुरबारातील साथ वेळेवर आटोक्यात आली, प्रभावी उपायोजना केल्याचे नगराध्यक्ष परवेजखान यांनी सांगितले.  यावेळी तिमाही खर्चाच्या हिशोबास मंजुरी देण्यात आली. शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आंबेबारा धरणातून 35 एमसीएफटी पाणीसाठा आरक्षीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील पथदिवे सौर उज्रेवर चालविण्यासाठी भुमिगत केबल टाकण्यासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. ज्ञानदीप सोसायटी ते शहराच्या हद्दीर्पयत अर्थात राजदरबार हॉटेलर्पयत पाईपलाईन टाकण्याचा विषय मंजुर करण्यात आला. नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत निधीची मागणी करण्यात आली. चारूदत्त कळवणकर, कुणाल वसावे, कैलास पाटील, दिपक दिघे, प्रशांत चौधरी यांनी चर्चेत सहभाग घेतला. 
 

Web Title: Allegations on Dengue issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.