निवडणुकीसाठीच्या सर्वच वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणार- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:28 IST2019-04-11T12:28:16+5:302019-04-11T12:28:31+5:30

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथक, सहाय्यक खर्च नियंत्रण निरक्षक आणि ...

All the vehicles for the election will be equipped with GPS system- Collector | निवडणुकीसाठीच्या सर्वच वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणार- जिल्हाधिकारी

निवडणुकीसाठीच्या सर्वच वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविणार- जिल्हाधिकारी

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथक, सहाय्यक खर्च नियंत्रण निरक्षक आणि राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, त्याद्वारे नियंत्रण कक्षातून वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.
पथकांचे काम अधिक कार्यक्षमपणे व्हावे आणि त्यांच्या कामकाजात पारदर्शकता रहावी यासाठी एकूण ३४ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बीएसएनएलच्या सहकार्याने बसविण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील चार भरारी पथकांच्या वाहनांवर, उत्पादन शुल्क विभागाच्या चार वाहनांवर आणि सहाय्यक खर्च निरीक्षक पथकाच्या सहा वाहनांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
भरारी पथकाद्वारे निवडणुकीत पैसे आणि वस्तुंची देवाण-घेवाणीसोबत आचारसंहितेच्या पालनाबाबत लक्ष दिले जाणार आहे. अवैध दारूचा निवडणुकीत होणारा उपयोग रोखण्यासाठी उत्पादनशुल्क विभागाची पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या पथकाद्वारे विविध रॅली-सभा व इतर माध्यमातून निवडणुकीत होणाऱ्या खर्चाबाबत माहिती संकलीत करण्यात येणार आहे.
मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात निवडणुका होण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, जीपीएस यंत्रणेमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार संघातील विविध भागावर लक्ष ठेवण्याबाबत योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.
जीपीएस प्रणालीमुळे वाहनाचे निश्चित ठिकाण करणार असल्याने पथकाचे कामकाज पारदर्शक होण्याबरोबरच आवश्यकतेनुसार पथकाला सूचना देणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे स्वत: जिल्ह्यात विविध ठिकाणी भरारी पथकांना भेट देवून पथकाच्या कामकाजाची पाहणीदेखील करीत आहेत.

Web Title: All the vehicles for the election will be equipped with GPS system- Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.