कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या चिंचपाड्यातील तिघांचे नमुने धुळ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:26 IST2020-04-15T12:25:59+5:302020-04-15T12:26:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे जिल्ह्यातील साक्री येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चिंचपाडा ता़ नवापुर येथील तिघांना सोमवारी ...

All three specimens from the Chinchpada that came in contact with the coronavidity were washed away | कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या चिंचपाड्यातील तिघांचे नमुने धुळ्याला

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या चिंचपाड्यातील तिघांचे नमुने धुळ्याला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे जिल्ह्यातील साक्री येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चिंचपाडा ता़ नवापुर येथील तिघांना सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते़ त्यांचे स्वॅब नमुने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीला दिले गेले असून अहवालाकडे लक्ष लागून आहे़
धुळे येथील खाजगी रुग्णालयात साक्री येथील कोरोनाबाधितावर उपचार करण्यात येत असताना नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथील ७० वर्षीय वृद्धाला डायलिसिससाठी नेण्यात आले होते़ वृद्धास त्यांची पत्नी व वाहनचालक असे तिघे आठ एप्रिल रोजी धुळे येथे गेले होते़ दरम्यान या तिघांचाही साक्री येथील कोरोनाबाधितासोबत संपर्क आल्याचे धुळे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते़ सोमवारी दुपारी धुळे जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना माहिती देत चिंचपाडा येथील तिघांना तातडीने क्वारंटाईन करण्याचे सूचित केले होते़ त्यानुसार जिल्हा प्रशासन, नवापुर तालुका प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीसांनी तातडीने चिंचपाडा येथे भेट देत दाम्पत्यासह चालकाला सोबत घेत सोमवारी रात्री उशीरा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ यातील ७० वर्षीय व्यक्तीची प्रकृती ही स्थिर असून त्यांचे मंगळवारी सकाळी डायलिसिस करण्यात आले़
तिघांचे स्वॅब नमुने सकाळी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे़ दाम्पत्य वृद्ध असल्याने त्यांना जिल्हा रुग्ग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात तर चालकाला नवापुर येथील क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले आहे़
सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ हरीश्चंद्र कोकणी यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने तिघांचा शोध घेतला होता़ तिघांचे स्वॅब नमुन्यांचा अहवाल बुधवारी दुपार पर्यंत मिळण्याची शक्यता आहे़ दरम्यान चिंचपाडा येथील तिघांच्या कुटूंबियांची चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: All three specimens from the Chinchpada that came in contact with the coronavidity were washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.