अक्कलकुव्यात सर्वच विभाग कोरोनावर मात करण्यासाठी घेताहेत कसोशीने मेहनत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:34 IST2020-05-07T12:33:55+5:302020-05-07T12:34:05+5:30

अनिल जावरे । लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी खापर आणि अक्कलकुवा याठिकाणी क्वारंटाईन ...

All sections in Akkalkuwa are working hard to overcome Corona | अक्कलकुव्यात सर्वच विभाग कोरोनावर मात करण्यासाठी घेताहेत कसोशीने मेहनत

अक्कलकुव्यात सर्वच विभाग कोरोनावर मात करण्यासाठी घेताहेत कसोशीने मेहनत

अनिल जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी खापर आणि अक्कलकुवा याठिकाणी क्वारंटाईन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत़ खापर येथील कक्षात आजवर ५३ जणांची असून यातील ४८ जण घरी सोडण्यात आले आहेत़ पाच जण अद्यापही येथील कक्षात आहेत़ अक्कलकुवा येथील कक्षात २५ पैकी दोघांना घरी पाठवण्यात आले असून येथे आता २३ जण आहेत़
दोन्ही कक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यंच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत़ कक्षांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि तंत्रज्ञ असे पथक तयार करुन सेवा देण्यात येत आहे़ कक्षात दाखल होणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याने त्यांच्यावर उपचार न करता त्यांच्यासोबत सामोपचाराचा संवाद ठेवण्यावर भर दिला जातो़ एका खोलीत जास्त वेळ राहून एकटेपणा येऊन नये म्हणून पथकांकडून सातत्याने त्यांच्यासोबत सोशल डिस्टन्सिंग ठेवत समुपदेशन केले जाते़ सर्वात प्रथम तालुक्यात खापर येथे कक्ष तयार करण्यात आला होता़ यानंतर अक्कलकुव्यात कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयात नव्याने क्वारंटाईन कक्ष तयार करण्यात आला़
दोन्ही कक्षामध्ये तालुक्यातील २५ वैद्यकीय अधिकारी, २९ एनएनएम, ११ प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा ६६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे़ दोन्ही कक्षांमध्ये डॉ़ हिंमत वळवी, डॉ़ स्वप्नील सूर्यवंशी, डॉ़ नितेश वसावे, डॉ़ सायसिंग वसावे, डॉ़ प्रदीप गोपाल, डॉ़ परदेशी, डॉ़बोळशेटे, डॉ़ रेखा नाईक, डॉ़ प्रमोद सोनवणे, डॉ़ योगेश पाटील, डॉ़ गणेश पाडवी यांचा समावेश आहे़
दोन्ही कक्षांमध्ये तहसीलदार विजय कच्छवे, गटविकास अधिकारी सीक़े़माळी, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे हे भेटी देऊन माहिती घेत आहे़ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़ गणेश पवार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ मालखेडे हे दररोज सकाळी आरोग्य विभागाकडे कक्षाचा आढावा सादर करुन कामकाजाची माहिती देतात़ दोन्ही ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्यांना नाश्ता, चहा आणि जेवणासह इतर भौतिक सुविधा देण्यात येत असल्याचे प्रत्यक्ष भेटी दरम्यान दिसून आले होते़

Web Title: All sections in Akkalkuwa are working hard to overcome Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.