सव्वादोन लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:06 IST2019-07-23T12:06:34+5:302019-07-23T12:06:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घरफोडीत चोरटय़ांनी सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नंदुरबारातील सरस्वतीनगर भागात 21 रोजी ...

All lodged in lieu of hundreds of millions | सव्वादोन लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास

सव्वादोन लाखांचा ऐवज घरफोडीत लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरफोडीत चोरटय़ांनी सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नंदुरबारातील सरस्वतीनगर भागात 21 रोजी रात्री नऊ वाजता घडली. 
सरस्वती नगरात राहणारे विलास तुळशीराम भावसार हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. रात्री  नऊ वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटातून रोख रुपये व सोन्याचे चेन असा एकुण दोन लाख 17 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रात्री भावसार हे घरी आले असता त्यांना कुलूप        तोडलेले दिसले. घरातील कपाटातील सामान देखील अस्ताव्यस्त आढळल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरिक्षक नंदवाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत विलास तुळशीराम भावसार यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार क्षिरसागर करीत आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: All lodged in lieu of hundreds of millions