ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:01+5:302021-06-29T04:21:01+5:30
याबाबत ट्रान्सपोर्ट संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले, कोरोनामुळे आर्थिक ...

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पाळला काळा दिवस
याबाबत ट्रान्सपोर्ट संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले, कोरोनामुळे आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामध्ये वाहतूकदारांचे कंबरडेच मोडले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वाहतूक व्यवसायातील जाचक अटी व सतत होणारी डिझेल पेट्रोल दरवाढ, इन्शुरन्स दरवाढ, वाहनावरील घेतलेले कर्जाचे हप्ते भरले गेलेले नाहीत. दुप्पट व्याजासह बँकेच्या खासगी वसुली एजन्सीकडून होणारा जाचक त्रासही वाढला आहे. या सर्व गोष्टीचे अवलोकन केले असता सामान्य वाहतूकदार संपण्याच्या मार्गावर आला आहे.
काळ्या फिती लावून निषेध
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वाहतूकदार चालक मालकांनी सोमवारी वाहनांवर काळे झेंडे व दंडावर काळी फीत बांधून सरकारच्या निषेध म्हणून काळा दिवस पाळण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेश रघुवंशी, सदस्य अमन रघुवंशी, अमित रघुवंशी, रहीम पिंजारी, संजय राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
या आहेत मागण्या...
१. सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिजेल दर कमी करावे.
२. ट्रक, बस, रिक्षा, टॅक्सी, वाहनांसाठी घेण्यात आलेल्या कर्जावरील लोन हप्त्याकरिता ६ महिने मुदतवाढ करावी.
३. प्रत्येक वर्षी वाढणारे इन्शुरन्स प्रीमियममधील वाढ थांबविण्यात यावी व सध्याचे रेट कमी
करण्यात यावे या सह ई-वे बिलमधील जाचक अटी रद्द करण्यात यावे.
४. डिजेल, पेट्रोल जीएसटीमध्ये घ्यावे.