अक्कलकुवा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:11+5:302021-09-02T05:05:11+5:30
शिबिराचे उद्घाटन जि.प.च्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, पं.स. सभापती मनीषा राजेश वसावे, उपसभापती ...

अक्कलकुवा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप शिबिर
शिबिराचे उद्घाटन जि.प.च्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, पं.स. सभापती मनीषा राजेश वसावे, उपसभापती विजय सामा पाडवी, जि.प. सदस्य प्रताप वसावे, सरपंच योगेश्वरी वळवी, माजी सभापती शिवराम वळवी, गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी आर.आर. देसले, तळोद्याचे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर आदी उपस्थित होते. या शिबिरात आर्टिफिशियल लिंब्स मॅनुफ्यॅक्च्युरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अर्थात अलिम्कोच्या वतीने शाळांमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शास्त्रीय पद्धतीने मोजमाप करण्यात आले. यावेळी सुमारे १०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षक उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे अलिम्कोच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तळोदा व अक्कलकुवा या दोन्ही तालुक्यांचे एकत्रित शिबिर आयोजित करण्यात आले होते. दोन्ही गटांतील बीआरसी कार्यालयातील अपंग समावेशीत शिक्षणचे शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक सोनवणे यांनी केले.