महामार्ग दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:41 IST2019-11-27T11:41:09+5:302019-11-27T11:41:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारीर्पयतचा रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांना ...

महामार्ग दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी ते कोंडाईबारीर्पयतचा रस्ता दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, अशा व्यथा मांडत दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी करण्यात आली. न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला.
महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात महामार्ग प्राधिकरण विभागाकडे रस्ता दुरुस्तीसाठी दोन वर्षात कोटय़वधीचा निधी आला असताना दुरुस्ती झाली नाही. वेळोवेळी पाठपुरावा करीत आंदोलनाचा इशारा दिल्यावर संबंधित विभागाकडून रस्ता दुरुस्ती सुरू असून लवकरच काम पूर्ण केले जाईल असे लिखित आश्वासन दिले गेले. परंतु प्रत्यक्ष दुरुस्तीच होत नसल्याने आश्यासनातून नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा भूमिकेमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर अनेकांना अपंगत्वही पत्करावे लागले आहे. संबंधित विभागाकडून अप्पर जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा लिखित स्वरुपात रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे सांगितले गेले आहे. प्रत्यक्षात बेडकीपासून कोंडाईबारीपयर्ंत आजतागायत रस्ता दुरुस्ती झालेली नसल्यामुळे संतप्त वाहन चालक मालक आणि सामाजिक कार्यकर्ता यांनी 30 नोव्हेंबरपयर्ंत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास 2 डिसेंबर रोजी बेमुदत रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर वाहन चालक मालक आणि नवापूर टॅक्सी चालक मालक संघटना अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता यांच्याही साक्षरी आहेत.
तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात 30 नोव्हेंबर्पयत महामार्ग दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न झाल्यास 2 डिसेंबरला रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत या तीन दिवसात कुठली भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांसह वाहनधारकांचे लक्ष लागून आहे.