मद्यपीचालक तर्राट, कोरोनामुळे कारवाई नसल्याने फावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:22+5:302021-07-07T04:37:22+5:30

नंदुरबार : कोरोनामुळे कारवाई होत नसल्याची संधी साधून मद्यपी अगदी सुसाट सुटले होते. आता मात्र त्यांच्यावर पुन्हा वचक बसविण्यास ...

The alcoholic Tarrat, Corona, fled due to lack of action | मद्यपीचालक तर्राट, कोरोनामुळे कारवाई नसल्याने फावले

मद्यपीचालक तर्राट, कोरोनामुळे कारवाई नसल्याने फावले

नंदुरबार : कोरोनामुळे कारवाई होत नसल्याची संधी साधून मद्यपी अगदी सुसाट सुटले होते. आता मात्र त्यांच्यावर पुन्हा वचक बसविण्यास वाहतूक नियंत्रण शाखेने सुरुवात केली आहे. कोरोना काळात कारवाई होत नसल्याने बिनधास्तपणे मद्य पिऊन वाहने चालवत असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यात होते. दरम्यान, दीड वर्षात २६४ जणांवर कारवाई झाली.

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने पोलीस महासंचालकांनी गेल्या वर्षी ‘ब्रेथ ॲनालायझर’ वापरास बंदी घातली होती, त्याला अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे वाहतूक शाखेकडे हे यंत्र धूळखात पडले आहे. त्याचा वापर करायला मर्यादा आल्या आहेत, त्याचाच गैरफायदा मद्यपी घेत आहेत. त्याचा परिणाम अपघाताची संख्याही वाढू लागली आहे.

कोरोनाच्या काळात ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची एकही कारवाई झाल्याची नोंद पोलिसांकडे नाही, अर्थात ‘ब्रेथ ॲनालायझर‘ यंत्र वापरण्याचीच परवानगी वाहतूक पोलिसांना नव्हती. मद्यविक्रीलाही बंदी असली तरी या काळात लपूनछपून मद्यविक्री सुरूच होती. असे असले तरी वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते जूनअखेर तब्बल १६२ केसेस केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा अशा व्यक्तींवर वचक कायमच राहिला असल्याचे चित्र आहे. २०२० मध्ये १०२ कारवाया झालेल्या आहेत. २०२० व २०२१ मध्ये जूनपर्यंत १६२ एकही कारवाई झालेली नाही. इतर कारवायांचा आकडा मात्र मोठा आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडण्याची गरज भासलीच तर तोंडाला मास्क सक्तीचा करण्यात आल्याने अडचणीही वाढल्या होत्या.

Web Title: The alcoholic Tarrat, Corona, fled due to lack of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.