लक्कडकोट शिवारातील हॉटेलवर मद्यपींचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 13:06 IST2019-05-05T13:06:09+5:302019-05-05T13:06:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील लक्कडकोट शिवारात बिल देण्याच्या वादातून गुजरातमधून आलेल्या चौघांनी हॉटेलमधील चौघांना बेदम मारहाण ...

लक्कडकोट शिवारातील हॉटेलवर मद्यपींचा धिंगाणा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील लक्कडकोट शिवारात बिल देण्याच्या वादातून गुजरातमधून आलेल्या चौघांनी हॉटेलमधील चौघांना बेदम मारहाण केली़ सुमारे दीड तासापेक्षा अधिक काळ मद्यपींचा हा धिंगाणा सुरु होता़
लक्कडकोट शिवारातील हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास परमजित सिंग, तरनजित सिंग सरदारजी, भरत गामीत, गिरीष गामीत सर्व रा़ जमादार फळी, सोनगढ जि़ तापी (गुजरात) हे जेवणासाठी आले होत़े दरम्यान जेवण आटोपल्यानंतर हॉटेलमधील वेटरने त्यांना बिल दिल्यानंतर चौघांनी वाद घालण्यास सुरुवात केली़ यावेळी त्यांनी पुन्हा जेवण मागवल़े वेटरने याचे बिल दिल्यानंतर चौघांनी हॉटेलमध्ये हाणामारी करण्यास सुरुवात केली़ यातून आत बसलेले इतर ग्राहकांची पळापळ झाली़ परमजित सिंग, तरनजित, गिरीष आणि भरत यांनी हातात काठी घेत वेटरसह हॉटेलमध्ये कामास असलेल्या युवकांना मारहाण केली़ यात एकाचे दात पडले तर इतरांना दुखापत झाली़ मारहाणीदरम्यान चौघांनी परत बिल मागितले तर मारुन टाकू अशी धमकी देत घटनास्थळावरुन पळ काढला़ या मारहाणीत मेघदास सुबोल सिकदार , संदीप प्रदीप विश्वास, इंद्रो चित्तू मंडल, आनंद मोहन बिष्ट सर्व रा़लक्कडकोट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती आह़े याबाबत मेघदास सिकदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणा:या चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत़
लक्कडकोट परिसरात गुजरात राज्यातून येऊन गुंडगिरी करणा:यांमुळे दरदिवशी हाणामारीचे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त होत आह़े