मद्यधुंदांनी चढवला कोविड हॉस्पिटलवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:16 IST2020-09-20T21:16:17+5:302020-09-20T21:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर असलेल्या निम्स कोविड हॉस्पिटलवर अज्ञात मद्यधुंद तरुणांनी हल्ला करत कर्मचारी व कोरोनाबाधितास ...

मद्यधुंदांनी चढवला कोविड हॉस्पिटलवर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील वळणरस्त्यावर असलेल्या निम्स कोविड हॉस्पिटलवर अज्ञात मद्यधुंद तरुणांनी हल्ला करत कर्मचारी व कोरोनाबाधितास मारहाण केली़ शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला़
शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली असून आयएमएच्या जिल्हा शाखेकडून या कृत्याचा निषेध करण्यात आला आहे़ शनिवारी रात्रीच्यावेळी वळणरस्त्यावर निम्स कोविड हॉस्पिटल समोर काही मद्यधुंद तरुणांनी एका ट्रकचालकास अडवून त्याच्यासोबत वाद घातला होता़ रस्त्याच्या मधोमध हा वाद सुरू असताना हॉस्पिटलचे कर्मचारी बाहेर येऊन हा प्रकार पाहत होते़ दरम्यान एक कर्मचारी घरी जात असताना मद्यधुंद तरुणांनी त्यास थांबवून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली़ त्याला वाचवण्यासाठी इतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली़ त्यांनाही तिघांकडून मारहाण करण्यास सुरूवात झाली़ या प्रकाराने भांबवलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने रुग्णालयात धाव घेतली़ तो दुसºया मजल्यावर पळत गेला़ त्याचा मारहाण करणाºया एका संशयितांने पाठलाग केला़ त्याने हाता बांबू हातात घेत दुसºया मजल्यापर्यंत जावून तोडफोड करत कोविड रुग्ण आणि कर्मचारी अशा दोघांना मारहाण करत करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला़ रुग्णालयात दाखल असलेल्या एका पोलीस अधिकाºयाला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच शहर पोलीस ठाण्यात माहिती देत पोलीसांना तातडीने दाखल होण्याचे सूचित केले होते़ शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यावर राकेश उर्फ सुरेश देविदास सामुद्रे, रविंद्र देविदास सामुद्रे व दिपक नारायण मराठे या तिघांना ताब्यात घेण्यात येऊन पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ तिघांविरोधात उमेश गुलाबराव पाटील यांच्या फिर्यादीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे़