अक्कलकुवा बैलबाजारात साडेतीन कोटीची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:29 IST2020-02-13T12:29:29+5:302020-02-13T12:29:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : जागृत देवस्थान श्री कालिका माता यात्रेत तीन राज्यांमधून २० हजारापेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल ...

अक्कलकुवा बैलबाजारात साडेतीन कोटीची उलाढाल
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : जागृत देवस्थान श्री कालिका माता यात्रेत तीन राज्यांमधून २० हजारापेक्षा अधिक बैल विक्रीसाठी दाखल झाले. यातून साडेतीन कोटीची उलाढाल झाली.
या यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून बैल व्यापारी व शेतकऱ्यांनी बैल विक्रीसाठी आणले आहे. २० हजार बैल विक्रीसाठी दाखल झाले होते. त्यात गावठी, खिल्लारी, नागोरी यासह अन्य जातीच्या बैलांचा समावेश दिसून आला. सातपुड्यातून सर्वाधिक बैल दाखल झाले असून गावठी जातीच्या बैलांना शेतकऱ्यांची अधिक पसंती दर्शवली. खिलारी जातीचे बैल दिसायला आकर्षक असले तरी त्यांना ग्रामीण भागातील शेतकºयांनी फारशी मागणी केली नाही.
शेतीकामात उपयोगी असणाºया गावठी जातीच्या बैलांना शेतकºयांसह व्यापाºयांकडूनही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. बैलबाजारात यंदा बैलांना अधिक भाव असल्याचे व्यापाºयांच्या प्रतिक्रिया राहिल्या. यात्रेत विक्रीसाठी आलेली खिलारी जातीची डौलदार बैलजोडी ही सर्वांचे आकर्षणाची ठरली होती. मात्र ही बैलजोडी खरेदीसाठी शेतकºयांसह व्यापाºयांतीही फारशी रुची दाखवली नाही. त्यामुळे ही बैलजोडी विकली गेली नसल्याने मालकाला परत न्यावी लागली. ७५ हजाराची हे खिल्लारी बैलजोडी अपेक्षित किंमत न मिळाल्याने विकता आली नाही.
गावठी जातीच्या बैलांच्या किंमती यंदा अधिक राहिल्याचे व्यापाºयांकडून सांगण्यात येत आहे. त्यात साधारणपणे ३० ते ४० हजार रुपये किमती राहिल्या. हे धडगाव येथील गावठी जातीच्या सर्वाधिक महाग एक लाख १० हजाराची बैलजोडीवरुन स्पष्ट झाले. ही जोडी विशेष आकर्षण ठरली असून या बैलजोडीला साक्री तालुक्यातील एका शेतकºयाने खरेदी केले.
सातपुड्यातील ४९ हजारात विकला गेलेला बैलही गावठी जातीचाच होता.
यंदा उलाढाल घटल्याचा प्राथमिक अंदाज