तळोदा तालुक्यात कृषी विभागाकडून कृषीसंजीवनी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST2021-06-28T04:21:21+5:302021-06-28T04:21:21+5:30
प्रसंगी माहिती देताना उपविभागीय अधिकारी जोशी यांनी कापूस पिकांची शेतीशाळा, ठिबकद्वारे पिकांना पाणी देण्याचे महत्त्व, घरगुती सोयाबीन पिकांची उगवण ...

तळोदा तालुक्यात कृषी विभागाकडून कृषीसंजीवनी सप्ताह
प्रसंगी माहिती देताना उपविभागीय अधिकारी जोशी यांनी कापूस पिकांची शेतीशाळा, ठिबकद्वारे पिकांना पाणी देण्याचे महत्त्व, घरगुती सोयाबीन पिकांची उगवण क्षमता याची विस्तृत माहिती दिली. या दरम्यान, त्यांनी कृषी संजीवनी सप्ताहाबाबत सांगितले. २१ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाचा १ जुलैला समाराेप होणार आहे. यानिमित्त पीक स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, धवळीविहीर, प्रतापपूर, रांझणी, मोदलपाडा, सोमावल, आदी मोठ्या गावांमध्ये कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. पीक स्पर्धेतंर्गत शेती उत्पादनात वाढ कशी होणार याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सप्ताहात अधिकाधिक युवकांना शेती व्यवसायाकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यशस्वीतेसाठी सूर्यकांता पाडवी, ए. बी. पाटील, अमोल बोरसे यांनी परिश्रम घेतले.