स्वामी समर्थ केंद्रातर्फे वाघोदे येथे कृषी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:57+5:302021-02-05T08:10:57+5:30
महोत्सवाचे उद्घाटन पं.स. सदस्य वीरसिंग ठाकरे, भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष व वाघोदाचे माजी सरपंच वासुदेव पाटील यांच्या हस्ते ...

स्वामी समर्थ केंद्रातर्फे वाघोदे येथे कृषी महोत्सव
महोत्सवाचे उद्घाटन पं.स. सदस्य वीरसिंग ठाकरे, भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष व वाघोदाचे माजी सरपंच वासुदेव पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून वाघोदेचे सरपंच सुभाष शेवाळे, उपसरपंच गोपाळ भिल, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, नांदर्डेचे सरपंच रमेश ठाकरे, वैजालीचे माजी उपसरपंच चुडामण पाटील, काथर्दे दिगरचे उपसरपंच गुलजारसिंग गिरासे, वैजालीचे उपसरपंच विनोद पाटील, काथर्दे दिगरचे पोलीस पाटील कोमलसिंग गिरासे, स्वामी समर्थ सेवा केंद्राचे जिल्हा प्रमुख मंगेश देवरे, शहादा तालुका प्रमुख प्रा.पवार, रवींद्र गिरासे, दादू गिरासे उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागातील सेवेकरी व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधावर घेण्यात येणारा विशेष उपक्रम देशी व गावरान बियाण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. शिवारफेरीद्वारे कृषी विभागाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान व खते यांची माहिती देण्यात आली. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व कृषीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी शेतीविषयक उपकरणे, बी-बियाणे, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, दुर्मिळ वनौषधी, आरोग्य प्रदर्शन, आधुनिक यंत्र अवजारे प्रदर्शन, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कृषी संस्कृती दर्शन स्टॉल उभारण्यात आले होते. कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वैजाली, वाघोदे, शहादा, प्रकाशा, परिवर्धे, काथर्दे दिगर, नांदर्डे आदी गावातील सेवेकऱ्यांसह अजबसिंग गिरासे, भीमराव पाटील,जतनसिंग गिरासे, भाई पाटील, गजमल चव्हाण, सुभाष पाटील, सतीश पाटील, शरद पाटील, रवींद्र पाटील, सुदाम पाटील, विश्वास धनगर, भरत धनगर, दर्शन पाटील, रमेश पाखरे, महेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, भटू पाटील, समाधान पाटील व पुरुष-महिला बालसंस्कार केंद्राच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.