विसरवाडीत कृषी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:50+5:302021-02-05T08:11:50+5:30
कार्यक्रमास जि.प. सदस्य भरत गावीत, सखाराम गावीत, उद्योजक जयेश अग्रवाल, ज्येष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे, केंद्र प्रतिनिधी रणजित पाटील, प्रमिलाबाई ...

विसरवाडीत कृषी महोत्सव
कार्यक्रमास जि.प. सदस्य भरत गावीत, सखाराम गावीत, उद्योजक जयेश अग्रवाल, ज्येष्ठ सेवेकरी अशोक रणधीरे, केंद्र प्रतिनिधी रणजित पाटील, प्रमिलाबाई पाटील, राम बायोटेकचे मुकुंद पाटील, व्यवस्थापक गवांडे, सचिन जी.डी. सूर्यवंशी, जैन इरिगेशनचे कृषी अधिकारी गोविंद पाटील, जतनसिंह वसावे, मोहन गावीत, प्रताप गावीत, शिवदास गावीत, नितीन गावीत, सोमू गावीत आदी उपस्थित होते. या महोत्सवात महिला अस्मिता विभागातर्फे आठ विभागाचे स्टाॅल मांडण्यात आले होते. शेतकऱ्यांना केळी, पपई, ऊस, कापूस, मका या पिकांविषयी तसेच शेती कशी करावी याबद्दल रणजित पाटील यांनी माहिती दिली. महिलांनी पूजापाठ कशी करावी, देवघर कसे असावे, नियमित आराधना कशी करावी याबाबत वंदना भोकरे व अनिता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. गोविंद पाटील यांनी शेतीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अर्जुन कुंभार व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अशोक रणधिरे यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी तयर आभार जी.डी. सूर्यवंशी यांनी मानले.