पुन्हा सम-विषम पार्किंग आणि एकेरी मार्गांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:57 IST2019-12-27T11:57:20+5:302019-12-27T11:57:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात दरदिवशी होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून सम-विषम पार्किंग आणि एकेरी वाहतूक ...

Again proposing heterogeneous parking and one-way parking | पुन्हा सम-विषम पार्किंग आणि एकेरी मार्गांचा प्रस्ताव

पुन्हा सम-विषम पार्किंग आणि एकेरी मार्गांचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात दरदिवशी होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून सम-विषम पार्किंग आणि एकेरी वाहतूक मार्गांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत़ या प्रस्तावांवर नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करुन नव्या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे़
नगरपालिका चौक, मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौक, घी-बाजार, गांधी पुतळा, हाट-दरवाजा, गणपती मंदिर, जळका बाजार, शिवाजी चौक व माणिक चौकात दैनंदिन वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या यामुळे नागरिकांसह या भागातील रहिवासी, व्यापारी हैराण झाले आहेत़ येथील बहुतांश रस्ते हे अरुंद असल्याने ही स्थिती निर्माण होत आहे़ यावर मार्ग काढण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे २० जुलै २०१९ पासून समविषम पार्किंग व एकेरी वाहतूकीच्या निर्णयाचा अंमलबजावणी करण्यात आली होती़ या अंमलबजावणीवर शहरातील काही नागरिकांनी आक्षेप घेतल्या होत्या़ यामुळे पुन्हा नव्याने वाहतूक नियमावली लागू करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचा विचार केला जाणार आहे़ यानुसार येत्या ५ जानेवारी २०२० पर्यंत नागरिकांनी शहर वाहतूक शाखेकडे याबाबत सूचना केल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांनी दिली आहे़
वाहतूक शाखेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूकीबाबतच्या अडचणी दूर होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे़ वाहतूक शाखेकडून गेल्या काही महिन्यांपासून वाहनांवर सातत्याने कारवाई होत असल्याने सामान्य वाहनधारक हैराण झाले आहे़ नियमांची अमंलबजावणी होणार असल्याने समस्या मार्गी लागणार आहे़

हाट दरवाजा, गणपती मंदिर, माणिक चौकाकडून येवून शास्त्री मार्केट कडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण घेऊन सरळ जात वळसा घेत शास्त्री मार्केटकडे जावे लागणार आहे़ शास्त्री मार्केट चौकाकडून सिराज बिल्डींग मार्गाने सरळ पालिकेडे जावे लागेल
महाराष्ट्र व्यायाम शाळा ते डॉ़ आंबेडकर पुतळा या भागात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायामशाळा मार्गाने जाणारी वाहने सोनार खुंटावरुन साक्रीनाक्याकडे जातील़ तर या मार्गाने चारचाकी वाहनांना प्रवेश बद करण्यात येणार आहे़ यात शासकीय व दुचाकी वाहनांना सुट दिली गेली आहे़ नवापुर चौफुलीकडून येणाºया वाहनांना जळका बाजार, शिवाजी चौक, देसाईपुरा मार्गाने शहरात प्रवेश दिला जाणार आहे़

शहरात खालीलप्रमाणे सम-विषम पार्किंग प्रस्तावित आहे़
नेहरु पुतळा ते पालिका रस्त्याची डावी आणि उजवी बाजू याठिकाणी समविषम पार्किंग होणार आहे़
नगरपालिका चौक ते बँक आॅफ बडोदा एटीएम उजवी बाजू व डावी बाजू या दरम्याऩ
शास्त्री मार्केट ते चंद्रकला साडी सेंटर दोन्ही बाजूला़
माणिक चौक ते जीजाजी शूज व डी़जे़मॅचिंग सेंट ते पटराणी साडीसेंटर या ठिकाणी़
गांधी पुतळा ते हाटदरवाजा या चौकादरम्यान नारायण एजन्सी ते पुष्पांजली एजन्सी तसेच सचिन एजन्सी ते पाणपोईपर्यंत याठिकाणी समविषम पार्किंगचा प्रस्ताव देण्यात आला आहे़
वाहतूक शाखेने ३१ डिसेंबरसाठी नियमावली लागू केली असून यादिवशी दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती कºणयात आली आहे़ तसेच मद्यप्राशन करुन चारचाकी व दुचाकी चालवणाºया वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे़

Web Title: Again proposing heterogeneous parking and one-way parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.