नंदुरबारात दोघा अपक्षांच्या माघारीनंतर ११ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 12:29 IST2019-04-13T12:28:46+5:302019-04-13T12:29:00+5:30
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून दोघा अपक्षांनी माघार घेतल्याने ११ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. असे असले तरी मुख्य लढत ...

नंदुरबारात दोघा अपक्षांच्या माघारीनंतर ११ उमेदवार रिंगणात
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून दोघा अपक्षांनी माघार घेतल्याने ११ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. असे असले तरी मुख्य लढत काँग्रेस महाआघाडी, भाजप महायुती आणि भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांच्यात ही लढत राहणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १४ उमेदवारांनी एकुण २४ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत आमदार डॉ.विजयकुमार गावीत, डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपतर्फे भरलेले अर्ज ए.बी.फॉर्म नसल्याने फेटाळण्यात आले होते. त्यामुळे १३ उमेदवारांचे १३ अर्ज शिल्लक होते. माघारीच्या शेवटच्या मुदतीत अपक्ष हेमलता कागडा पाडवी व भरत जाल्या पावरा यांनी अर्ज माघार घेतला. त्यामुळे ११ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
रिंगणातील उमेदवारांमध्ये काँग्रेस महाआघाडीतर्फे अॅड.के.सी.पाडवी, भाजप महायुतीतर्फे डॉ.हिना विजयकुमार गावीत, भाजप बंडखोर अपक्ष डॉ.सुहास नटावदकर, बहुजन समाज पार्टीच्या रेखा सुरेश देसाई, बहुजन वंचीत आघाडीचे सुशिल सुरेश अंतुर्लीकर, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे कृष्णा ठोगा गावीत, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संदीप अभिमन्यू वळवी, अपक्षांमध्ये अजय करमसिंग गावीत, अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे, अशोक दौलतसिंग पाडवी, आनंदा सुकलाल कोळी यांचा समावेश आहे.