दोन महिन्यानंतरही पुलाची दुरुस्ती होत नसल्याने शेतक:यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:40 IST2019-11-10T12:40:46+5:302019-11-10T12:40:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने ...

दोन महिन्यानंतरही पुलाची दुरुस्ती होत नसल्याने शेतक:यांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. या घटनेला दोन महिने उलटूनही संबंधित विभागाने दुरुस्तीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून शेतक:यांना शेतमाल वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे.
शहादा तालुक्यातील गोगापूर परिसरात दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाल्याने गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीला पूर आला होता. या पुलामुळे पुलाला भगदाड पडून पुलाचा काही भाग वाहून गेला. या रस्त्यावर दोन्ही गावातील शेतक:यांची मोठय़ा प्रमाणावर शेती आहे. शेतमाल घेऊन जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर शेतकरी करतात. परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाल्याने या मार्गावरील खापरी नदीवरील पूल पुरामुळे अर्धा वाहून गेला आहे. त्यामुळे शेतात वाहने नेण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या कापूस वेचणीसह इतर पिकांची काढणी सुरू असून रब्बी हंगामासाठी शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शहादा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. परंतु गोगापूर ते तिधारे रस्त्यावरील खापरी नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेला दोन महिने उलटले. तरीही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. शेतक:यांचे शेतमाल व अवजारे ने-आण करण्यासाठी हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.