‘प्रियकरा’ला बसताच पब्लिकचा मार ‘प्रेयसी’ झाली पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:22 IST2020-02-15T13:21:58+5:302020-02-15T13:22:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी निर्जन ठिकाणाचा आसरा घेणे प्रियकर आणि प्रेयसीला चांगलेच महागात पडल्याची ...

After hitting 'Dear boy', the beat of the public became 'beloved' | ‘प्रियकरा’ला बसताच पब्लिकचा मार ‘प्रेयसी’ झाली पसार

‘प्रियकरा’ला बसताच पब्लिकचा मार ‘प्रेयसी’ झाली पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी निर्जन ठिकाणाचा आसरा घेणे प्रियकर आणि प्रेयसीला चांगलेच महागात पडल्याची घटना शुक्रवारी शहरातील बायपास रोडवरच्या उड्डाण पुलाखाली घडली़ यावेळी परिसरातील पब्लिकचा मार बसत असताना प्रेयसी दुचाकी काढून पसार झाल्याने या प्रकारावर पडदा पडला़
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते़ नात्यात असलेले आणि नाते जुळण्यासाठी उत्सुक असलेले प्रेमवीर भावनांना मुक्त करण्यासाठी संधीच्या शोधात होते़ यातून शहरातील विविध भागात सकाळी बऱ्यापैकी गर्दीही दिसून आली़ दरम्यान दुपारी वळणरस्त्यावरील उड्डाणपुलाखालून उमर्दे रस्त्यावर असलेल्या निर्मनुष्यतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न प्रियकर आणि प्रेयसीत सुरु होता़ याच भागातील बंद असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीलगत दोघे ऐकमेकांना व्हॅलेंटाईच्या शुभेच्छा देत भावना व्यक्त असताना काहींची नजर त्यांच्यावर पडली़ यातून गलका वाढत जाऊन गर्दी गोळा झाली़ दोघांची विचारपूस केल्यावर एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती दिली़ चौकशी वाढून प्रियकर अरेरावी करत असतानाच एकदोघांनी त्याच्यावर हात उचलत सार्वजनिक जागेवर चुकीचे काम करत असल्याचे सांगून बदडण्यास सुरुवात केली़ पब्लिकचा संताप लक्षात आल्यानंतर त्या प्रेयसीने थेट दुचाकी स्टार्ट करुन घराकडे जाणे पसंत केले़ या प्रकारानंतर प्रियकरही तेथून सटकल्याची माहिती आहे़
दुपारी तब्बल एक तास सुरु असलेल्या प्रकारामुळे उड्डाणपुलावरुन धुळे चौफुलीकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती़ बघ्यांची गर्दी झाल्याने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्या ठिकाणी भेट गर्दी आटोक्यात आणल्याची माहिती आहे़
दरम्यान याठिकाणी आढळून आलेली युवती ही अल्पवयीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ दोघांनाही समज देत असताना युवकाने विरोध केल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे़

Web Title: After hitting 'Dear boy', the beat of the public became 'beloved'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.