शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वडील, आजी नंतर आता नातूकडे आली राष्ट्रवादीची धूरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षभरापासून अध्यक्षाविना असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर डॉ.अभिजीत मोरे यांच्या रुपाने अध्यक्ष मिळाले. प्रदेशाध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या वर्षभरापासून अध्यक्षाविना असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर डॉ.अभिजीत मोरे यांच्या रुपाने अध्यक्ष मिळाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी, मुंबई येथे पक्ष कार्यालयात डॉ.मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले. डॉ.मोरे यांचे वडिल हे पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या आजी दहा वर्ष जिल्हाध्यक्षा होत्या. आता त्यांच्याकडे हे पद आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत प्रचंड रस्सीखेच होती. पक्ष निरिक्षक आले असता त्यांना दोन मेळावे घ्यावे लागले होते. त्यामुळे कुठल्या गटाला अध्यक्षपद मिळते याकडे लक्ष लागून होते. परंतु पक्ष अडचणीत असतांना आणि जिल्हा परिषद निवडणुकीत नेतृत्वहिन असतांना डॉ.अभिजीत मोरे यांनी कुठलेही पद नसतांना पक्षाला सांभाळले. कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यामुळे अनेक गटात पक्षाने प्रस्थापित उमेदवारांना चांगली टक्कर दिली. गेल्या वर्षभरापासून पदाची अपेक्षा न बाळगता मोरे यांनी पक्ष कार्य सुरू ठेवले होते.त्यांच्या या कार्याची दखल अखेर पक्षाला घ्यावी लागली. मुंबई येथे बुधवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, त्यांचे वडिल कै.दिलीप मोरे यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी केली होती. ते पहिले जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यात मोठे योगदान दिले होते. त्यानंतर त्यांच्या आजी कै.कमलाताई मराठे यांच्याकडे हे पद आले. त्यांनी देखील १० वर्षापेक्षा अधीक काळ पक्षाची धुरा सांभाळून पक्ष गाव, पाड्यापर्यंत नेला. याच काळात डॉ.अभिजीत मोरे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धूरा होती ती त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.आता पुन्हा त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा आली आहे. पक्ष संघटन वाढविणे, कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, तळागाळातील लोकांची कामे करणे व येत्या काळात दोन आमदार निवडून आणणे हे आपले ध्येय असल्याचे डॉ.अभिजीत मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.